Quantcast
Channel: Women’s health
Viewing all articles
Browse latest Browse all 492

महिलादिन2015 : या ’7′टीप्स तुम्हाला बनवतील ‘सुपरवुमन’!

$
0
0

पुरुषप्रधान भारतीय संस्कृतीमध्ये  स्त्रीयांना कळत-नकळत गृहितच  धरलं जाते.  बर्‍याचदा  घर, कुटुंब आणि  स्वतःचं करियर या सार्‍यांना  सांभाळताना  तीची कायमच कसरत होत असते.त्यामुळे तीच्या आरोग्याची हेळ्सांडच  होते . मग रोजच्या धकाधकीतून थोडासा वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी द्या. त्यासाठी या काही टीप्स  जरुर आजमावून  पहा.

1) थोडा वेळ हा ‘स्वतः’साठी  काढा -

दिवसभर इतरांसाठी राबणार्‍या स्त्रीला दिवसभरातील  काही वेळ हा फक्त स्वतःच्या आवडीनिवडीसाठी सुद्धा देणं गरजेचे आहे.  या स्वतःसाठी राखून ठेवलेल्या वेळेत तुम्ही एखादा  छंद जोपासू शकता, नविन काही शिकू शकता किंवा अगदी वाचनही  करू शकता.  यामुळे  तुमच्यावरील  त्राण कमी होण्यास  मदत होते तसेच नेहमीच्या कामातून थोडासा ब्रेक मिळाल्याने पुन्हा नव्याने काम करण्यास उर्जा मिळेल.

2) सकस आहार घ्या -

महिलांनी सशक्त राहण्यासाठी सकस व वेळच्यावेळेस आहार घेणे फार गरजेचे आहे.  वारंवार शिळे पदार्थ खाणे टाळा. तुमच्या आहारातुन पुरेशी पोषकद्रव्ये शरिराला मिळतील याची खात्री करा. दही, दुध यासारखे दुग्धजन्य पदार्थ, अंडी व पोषक  कडधान्य यांचा नियमित आहारात समावेश करा.

3) प्राणायम करा -

प्राणायम हा अगदी साधा व सोपा योगप्रकार आहे.  प्रवासादरम्यान तुम्ही किमान 5 मिनिटं दीर्घ श्वसन केल्यास तुम्हाला  शांत वाटेल. कार्यालयाच्या कोंदट वातावरणापेक्षा मोकळ्या हवेत प्राणायम  करण्याचा प्रयत्न करा.  प्राणायमामुळे तुमच्या मनातील नकारात्मक विचार दुर होतील व तुम्हाला नवचैतन्य मिळेल.

4) रात्री लॅवेंडर  तेल वापरा-

जर तुम्हाला रात्री अस्वस्थ वाटत असेल किंवा झोप येत नसेल तर उशीवर  लॅवेंडर  तेलाचे काही  थेंब टाका.  यामुळे  तुम्हाला रात्री शांत झोप येण्यास  मदत होईल.

5) ‘हस्तमुद्रा’ करा-

तुम्ही अतिशय थकला असाल अशावेळी ‘हस्तमुद्रा’ करण्याने तुमचा थकवा दुर होण्यास मदत होईल. हस्तमुद्रा कोठेही व कुठल्याही स्थितीत तुम्ही करू शकता.  तुमच्या हाताचे मधले बोट व  अंगठा यांची टोक एकमेकांना जुळवा. व डोळे बंद करुन दीर्घश्वसन करा. किमान 5-10 असे केल्याने तुम्हाला शांत वाटेल.

6) वजन  कमी करण्यासाठी  दालचिनी  खा-

तुम्ही तुमच्या वाढत्या वजनाने चिंतित आहात आणि जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी योगा किंवा जिममध्ये जाणं शक्य  नाही तर ‘दालचिनी’चे सेवन  अवश्य करा. दिवसातून चार-पाच वेळेस दालचिनीचा तुकडा चघळा. यामुळे सतत गोड खाण्याची इच्छा व अवेळी लागणारी  भूक आटोक्यात राहील.

7) अ‍ॅमेथिस्ट बॉल घरात ठेवा

‘अ‍ॅमेथिस्ट बॉल’ घरात ठेवल्याने त्यातील सकारात्मक लहरींमुळे परिसरात एकोपा व समतोल राखण्यास मदत होते.  अ‍ॅमेथिस्ट बॉल  हा तुमच्या कार्यालयात टेबलावर ठेवा. यामुळे  कामं सुरळीत पार पडतील.

 

छायाचित्र सौजन्य – Getty Images


 मराठीत ‘आरोग्य व उपचार’ संबंधित अधिक लेख वाचण्यासाठी , मराठी विभागाला अवश्य भेट द्या .

 

 

 

 

 

 

 


Viewing all articles
Browse latest Browse all 492

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>