अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेणे हा अतिशय सोपा मार्ग आहे. परंतु, अभ्यासातून असे दिसून आले आहे की त्यामुळे शरीरात बरीच उलथापालथ होते आणि उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवतात. कार्डिओव्हॅस्कुलर आजारांचा धोका वाढतो. त्याचबरोबर डोकेदुखी, मळमळ आणि वजन वाढणे यांसारखे दुष्परिणाम होतात. तसंच स्त्रियांमध्ये हे त्रास दीर्घ काळापर्यंत राहतात.
गर्भनिरोधक गोळ्या आणि हृदयविकार यांचा संबंध:
गर्भनिरोधक गोळ्या सतत घेतल्यास उच्च रक्तदाब होऊ शकतो. तसंच स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक्सचा धोका वाढतो. स्थूलता, धूम्रपान, predisposed heart condition या समस्या असताना त्या बरोबरीने गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यास त्याचा परिणाम नक्कीच स्त्रियांच्या हृदयाच्या आरोग्यावर होतो. विशेषतः ज्या स्त्रिया estrogen आणि progesterone युक्त गोळ्या घेतात. परंतु, हे सिद्ध करणारी खूप कमी माहिती उपलब्ध आहे. गर्भनिरोधक गोळ्यांचा परिणाम स्त्रियांच्या हृदयावर लगेचच होत नाही. परंतु, गोळ्या सतत घेतल्यास म्हणजेच ५ वर्षांपेक्षा अधिक काळ दररोज घेतल्यास समस्या निर्माण होऊ शकतात, असे मुंबईच्या Cloudnine Hospital च्या Consultant Gynaecologist and obstetrician, Dr Meghana Sarvaiya यांनी सांगितले आहे . गर्भनिरोधक गोळ्यांसंबंधी या 5 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
वयाची ३५ शी ओलांडल्यानंतर जर एखादी स्त्री गर्भनिरोधक गोळ्या घेत असेल तर त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या (ब्लड क्लाटस) होण्याची शक्यता असते. त्यामुळे स्ट्रोक किंवा ischemic हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे डॉ. मेघना यांनी सांगितले. २०१५ च्या अभ्यासानुसार ज्या महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांच्यात गर्भनिरोधक गोळ्या न घेणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत १.६ पटीने अधिक रक्ताच्या गुठळ्या होतात. तसंच ज्या स्त्रिया estrogen ची पातळी अधिक असलेल्या गोळ्या घेतात त्यांच्यात क्लॉटस तयार होण्याचा धोका दुप्पटीने वाढतो. अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की, estrogen चे प्रमाण कमी असलेल्या गोळ्या काहीशा सुरक्षित असतात. परंतु, गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी कोणत्या प्रकारच्या गोळ्या तुम्हाला योग्य ठरतील याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच चांगले. रक्ताच्या गुठळ्या किंवा इतर समस्या उद्भवू नयेत म्हणून ३०शी च्या शेवटच्या टप्प्यात गर्भनिरोधक गोळ्यांबरोबरच रक्त पातळ होण्यासाठी ( blood thinners) देखील गोळ्या दिल्या जातात. हे महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच स्त्रिया मोनोपॉज किंवा वयाच्या ४५ शी पर्यंत या गोळ्या घेत असतात, असे डॉ. सर्वैद्य म्हणाल्या. गर्भनिरोधक गोळ्या घेऊनही या ५ चुकांमुळे तुम्ही गरोदर राहू शकता.
कोणती काळजी घ्याल?
- गर्भनिरोधक गोळ्या घेण्यापूर्वी तुम्हाला हृदयाची कोणती समस्या नाही ना, हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरांशी बोला.
- गर्भनिरोधक गोळ्या घेताना तुमचे वजन नियंत्रित राहिले असे पहा. त्यासाठी नियमित व्यायाम करा आणि आहाराच्या योग्य सवयी पाळा.
- छातीत दुखणे, घाम येणे, थकवा येणे यांसारखी हृदयाच्या समस्यांची कोणतीही लक्षणे जाणवल्यास त्याकडे गंभीरतेने पहा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे वंधत्व येते का?